कोरोनावरील औषधावर पतंजलीचा अजब खुलासा; बातमी वाचाच...

 Patanjali bizarre revelation on medicine on corona Read the news
Patanjali bizarre revelation on medicine on corona Read the news

नवी दिल्ली- पतंजली कंपनीकडून कोरोनावरील प्रभावी म्हणून कोरोनिल औषध लॉंच करण्यात आले होते. मात्र, लॉन्चिंगपासूनच हे औषध वादात अडकले आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या औषधाची जाहीरात न करण्याचे आदेश पतंजलीला दिले होते. यावर पंतजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने औषधाची जाहीरात केलेली नसून आम्ही फक्त कोरोनिल औषधाच्या चाचणीमधून मिळालेले परिणाम लोकांना सांगितले आहेत, असं ते म्हणाले आहेत. 

Breaking : कोरोनावरील 'फॅबिफ्ल्यू' गोळ्यांवर खासदार डॉ. अमोल कोल्हे
कोरोनावरील औषध तयार करताना  आम्ही पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. औषधातून मिळालेल्या सबळ परिणामांच्या आधारे आम्ही परवान्यासाठी अर्ज केला आहे. औषधाच्या संयुगांवर आम्ही काम केलं आहे. तसेच या औषधाची वैद्यकीय चाचणी लोकांवर घेण्यात आली आहे, असं बाळकृष्ण म्हणाले आहेत. आम्ही परवाना मिळवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग अवलंबला नाही. तसेच या औषधाची जाहीरातही आमच्याकडून करण्यात आलेली नाही, आम्ही केवळ लोकांसमोर या औषधापासून मिळाले तथ्य समोर ठेवले आहेत, असंही ते म्हणाले आहेत. 

कोरोनावरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला ब्रिटनमध्ये सुरवात 
योगगुरु रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांच्याकडून मंगळवारी कोरोनावरील औषध कोरोनिल याचे लॉन्चिंग करण्यात आले होते. कोरोनिल औषध कोरोना विषाणूवर 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा रामदेवबाबांनी केल्याने मोठी खळबळ उडाली. औषधाची मानवी चाचणी घेण्यात आल्याचंही पतंजलीने सांगितलं आहे.  मात्र, भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने औषधाच्या जाहीरातीवर बंदी आणली आहे. योगगुरूंनी देशाला एक नवे औषध दिले हे बरेच झाले पण त्यांनी घोषणा करण्याआधी आयुष मंत्रालयाची परवानगी घ्यायला हवी होती. आता यासंदर्भात अधिकृत कागदपत्रे रामवदेबाबांनी आमच्याकडे पाठविली असून त्याची पडताळणी केल्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनावरचं प्रभावी औषध देशातील या 5 राज्यांमध्ये पोहोचलं, आठवड्याभरात 1 लाख..
दरम्यान, पतंजली संस्थेने कोरोना विषाणूवरील औषधाची घोषणा करताच वाद सुरु झाले आहेत. उत्तराखंडच्या आयुर्वेद औषध परवाना प्राधिकरणाने पंतजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पतंजलीच्या औषधाला कोरोना विषाणूवरील उपचारासाठी नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणे आणि सर्दी-खोकल्यासाठी परवाना देण्यात आला आहे, असं प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतजलीच्या कोरोनिल औषधाबाबत गोंधळ उडाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com