‘पतंजली’च्या जीन्स 2019 मध्ये बाजारात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पणजी- 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात दाखल होतील, पुढील वर्षापर्यंत पतंजलीचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात येतील असे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले. पणजी येथील अॅडवर्टायजिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गोवा फेस्ट-2018' मध्ये त्यांनी ही घोषणा केली. 

रामदेव म्हणाले, लोक मला विचारतात की पतंजलीची जिन्स बाजारात कधी येणार आहे? आम्ही लवकरच बाजारात पतंजलीचे कपडे आणणार आहोत, पारंपारिक कपड्यांसोबतच लहान मुलं, महिला आणि पुरुषांसाठीचे कपडे 2019 पर्यंत बाजारात येतील. तसेच येत्या काळात पतंजली स्पोर्ट्स आणि योगा साठीचे विशेष कपडेही तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: patanjali jeans will be in market in 2019 says baba ramdev