'म्युकरमायकोसिसवर आठवड्यात आयुर्वेदिक औषध'

baba ramdev
baba ramdev

भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव (Coronavirus in India) हळू हळू कमी होत आहे. पण, म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. काही राज्यांनी याला संसर्गजन्य आजार म्हणून जाहीर केलं आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये या रोगाचा सर्वाधिक प्रभाव आहे. देशातील इतर राज्यातही दिवसागणिक म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढतच आहे. योगगुरु स्वामी रामदेव (Swami Ramdev) यांनी आठवडाभरात म्युकरमायकोसिसवर आयुर्वेदिक औषध घेऊन येणार असल्याचा दावा केला आहे. आज तक या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलाताना बाबा रामदेव यांनी दावा केला आहे.

एका आठवड्याच्या आत म्युकरमायकोसिसवर आयुर्वेदिक औषधं घेऊन येत आहे. हे औषध ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाइट फंगस यांना मुळापासून ठीक करेल. या औषधाचं काम पुर्ण झालं आहे. अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुरु आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.

baba ramdev
'मला कुणाचा बाप अटक करू शकत नाही' : रामदेव बाबा

अ‍ॅलोपॅथी (Allopathy) उपचार पद्धतीवर टीका केल्यामुळे रामदेव बाबा आणि आयएमए असा वाद सुरु झाला. यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले की, माझ्या कामापासून कधीही मागे सरकलो नाही. वाद सुरु असतानाही 18 तासअद्यापही सेवा करत आहे. आठवडाभरात ब्लॅक, व्हाईट आणि येलो फंगसवर आयुर्वेदिक औषध घेऊन येणार आहे.

baba ramdev
'तुम्ही 25 विचारले, आम्ही पाचच विचारु'; IMA चं रामदेव यांना ओपन चॅलेंज

बाबा रामदेव यांनी नेमकं काय म्हटलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये बाब रामदेव म्हणतात, "कोविड-१९ महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत"

बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स आक्रमक

बाबा रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथीविरोधातील या विधानामुळं सध्या कोविड संकटात रुग्णालयांमध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स आणि हेल्थवर्कर्समध्ये मोठा राग आहे. दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर आक्षेत नोंदवत त्यांच्यावर महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com