Pathaan : शेर इंटरव्ह्यू नहीं देते... शाहरुखचं ट्विट, पण रोख कुणाकडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Movie

Pathaan : शेर इंटरव्ह्यू नहीं देते... शाहरुखचं ट्विट, पण रोख कुणाकडे?

मुंबईः शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांचा पठान हा सिनेमा लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहे. शाहरुख खानने 'पठान'च्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला आहे. आज शाहरुखने केलेलं एक ट्विट मात्र खूपच चर्चिलं जात आहे.

शाहरुखने पठान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजूनपर्यंत इंटरव्हूव्ह दिलेला नाही. शिवाय तो कोण्या टीव्ही शोमध्ये प्रमोशनसाठी गेलेला नाही. पठान सिनेमाच्या बॉयकॉटची मागणी एक गट करीत आहेत.

शाहरुखने आज ट्विटरवर लाईव्ह केलं. यामध्ये त्याने #AskSRK सेशन ठेवलं होतं. ज्यात फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं किंग खानने दिली. एका चाहत्याने विचारलं की, कुठलंही प्रमोशन केलेलं नसतांना पठान सिनेमा एवढा लोकप्रिया का झाला?

फॅन्सच्या प्रश्नाला शाहरुखने आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. 'मैने सोचा शेर इंटरव्ह्यू नहीं करते तो इस बार मैं भी नहीं करुंगा... बस जंगल में आकर देख लो #Pathaan' असं उत्तर शाहरुखने दिलं आहे. शाहरुखच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करु लागले आहेत.

शाहरुख खानचा 'पठान' सिनेमा बॉक्स ऑफिस वर चांगलाच जलवा दाखवत आहे. पहिल्याच दिवशी पठाणने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडीशी उतरण पाहायला मिळाली. पण तिसऱ्या दिवसाअखेरी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या पठानने जगभरातून तीन दिवसात 300 कोटींची कमाई केली आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवलेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने एकूण 300 कोटींची कमाई केली आहे.