पठाणकोट हल्लाप्रकरणी आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

या वर्षाच्या सुरवातीलाच पाकिस्तानने पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करून भारताला जणू नववर्षाची भेट दिली होती. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सात लष्करी अधिकारी हुतात्मा झाले होते.

नवी दिल्ली - पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज (सोमवार) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यात आले.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये जैशे मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यासह पाकिस्तानमधील अब्दुल असगर, शाहिद लतीफ आमि काशीफ जन या तीन दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

या वर्षाच्या सुरवातीलाच पाकिस्तानने पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करून भारताला जणू नववर्षाची भेट दिली होती. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सात लष्करी अधिकारी हुतात्मा झाले होते. तर, चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील "जैशे महंमद‘ हा दहशतवादी गटच होता हे आरोपपत्रांवरून स्पष्ट
झाले आहे. 

Web Title: Pathankot Attack: Jaish Chief Masood Azhar, 3 Others Named In Chargesheet Filed By National Investigation Agency