Loksabha 2019 : खंदा मोदीविरोधक काँग्रेसच्या तंबूत; हार्दिक पटेलची नवी खेळी

hardik_patel
hardik_patel

अहमदाबाद - येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक सुरु झाली असून, या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहीत हार्दिक पटेल देखील उपस्थित आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर हार्दिक यांनी ट्विटरद्वारे काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या रंगली आहे. 

गुजरातमधील जामनगर लोकसभेच्या जागेवर सध्या भाजपच्या पुनमबेन मादम या खासदार आहेत. हार्दिक पटेल आता या जागेवरून लढण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघात भाजपला 'काटे की टक्कर' मिळण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com