हार्दिक पटेल अडकणार आता 'या' बंधनात

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

अहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे हार्दिक व किंजल यांचा ब्रेकअप झाल्याच्या अफवांना पुर्णविराम मिळणार आहे. विवाहानंतर हार्दिक लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या डिगसरमध्ये 27 जानेवारी रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. यावेळी 100 जणांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे हार्दिकचे वडील भारतभाई पटेल व निकटवर्तीय निखील सवानी यांनी सांगितले.

हार्दिक व किंजल लहानपणापासूनचे मित्र आहेत. किंजली ही हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. किंजल परिख-पटेल असून तिने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहे. किंजल पटेल ही मूळची अहमदाबाद जिल्ह्याच्या वीरमागामची राहिवासी आहे. मात्र, सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत सुरतमध्ये राहते. हार्दिकचे मूळगावही विरमागाममधील चंदन नगरी हे आहे. विवाहसोहळा दोन दिवसांचा असणार असून, दोन्ही कुटुंबीयांकडून 100 जण उपस्थित राहणार आहेत. विवाह पारंपरिक आणि साध्या पद्धतीने होणार आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली 2015 साली गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे हिंसक आंदोलन झाले होते. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले. त्यावेळी हार्दिकचे वय 22 होते. तेव्हापासून पाटीदार समाजाचा नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

Web Title: Patidar leader Hardik Patel to get married on Jan 27