धक्कादायक! कूलर लावायचा होता म्हणून काढला व्हेंटिलेटरचा प्लग; अन्...

वृत्तसंस्था
Sunday, 21 June 2020

कूलर लावण्याची परवानगी नाही

- सरकारी रुग्णालयात होते उपचार सुरु

कोटा : देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार केले जात आहेत. मात्र, राजस्थानात एक वेगळीच घटना घडली आहे. कोरोनावर उपचार सुरु असल्याने संबंधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच्या नातेवाईकांना कूल लावायचा होता म्हणून त्यांनी चक्क व्हेंटिलेटरचा प्लग काढला. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोटा जिल्ह्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार संबंधित रुग्णाला 13 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानुसार कोटाच्या महाराव भीम सिंह (एमबीएस) रुग्णालयात या 40 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू होते.

Ventilator

या व्यक्तीला 15 जून रोजी दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. त्यामुळे तेथे त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याचदरम्यान ही घटना घडली. या दुसऱ्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात उकाड्याने हैराण झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची कूलर लावण्यासाठी धडपड सुरु होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नातेवाईकांना कूलर लावण्यासाठी कोणताही सॉकेट मिळाला नाही. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णाला लावलेला व्हेंटिलेटरचा प्लग काढला आणि त्याऐवजी कूलरचा प्लग लावला. व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने रुग्णाला त्रास होऊ लागला. परिणामी, या रुग्णाचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले.  

रिपोर्ट निगेटिव्ह

या रुग्णावर कोरोना संशयित म्हणून उपचार सुरु होते. त्यानुसार त्याची कोरोनाची चाचणीही घेण्यात आली. मात्र, जेव्हा त्याचा कोरोना अहवाल समोर आला. तेव्हा संबंधित रुग्णाला कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता.

Ventilators

कूलर लावण्याची परवानगी नाही

रुग्णाच्या नातेवाईकांनी कूलर लावण्यासाठी रुग्णालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. परंतु, या नातेवाईकांनी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे.

सरकारी रुग्णालयात होते उपचार सुरु

राजस्थानमधील रुग्णावर कोटा जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्याचा यामध्येच मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient dies after family members switch off ventilator to plug in cooler at Kota hospital Rajasthan