नेहरूंच्या अवमानप्रकरणी मॉडेल पायल रोहतगी ताब्यात

टीम ई-सकाळ
रविवार, 15 डिसेंबर 2019

राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी पायलला ताब्यात घेतले आहे. पायल विरोधात नेहरूंचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त व्हिडिओंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी हिला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप तिला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for payal rohtagi hot

कशामुळे झाली अटक? 
या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी पायलला ताब्यात घेतले आहे. पायल विरोधात नेहरूंचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. बुंदी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक ममता गुप्ता यांनी सांगितले की, पायल रोहतगीला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पायलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल नेहरू यांचा अपमान केला आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी विषयीही बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. युवक काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पायलच्या विरोधात कलम 66 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायलने नेहरू कुटुंबाविषयी वक्तव्य करूना बदनामीच्या हेतून चुकीचे आरोप केले आहेत, असे शर्मा यांनी तक्रारीत म्हटले होते. 

आणखी वाचा - अमितभाई मातोश्रीवर जाणार होते; फडणवीसांचा खुलासा

कोम आहे पायल? 
पायल बिग बॉसच्या सिझन 8मध्ये कंटेस्टंट होती. मॉडेलिंग बरोबरच तिनं हिंदी सिनेमांमध्ये छोटे-छोटे रोल केले आहेत. पेज थ्री, 36 चायना टाऊन, ये क्या हो रहा है, यांसारख्या सिनेमात ती दिसली होती. नच बलिएच्या 2015च्या सिझनमध्येही कंटेस्टंट होती. गेल्या काही वर्षांत ती सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित आहेत. तिची वक्तव्यं प्रामुख्यानं काँग्रेस आणि काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: payal rohtagi detained by rajasthan police for insulting pandit jawaharlal nehru