पेटीएमच्या संस्थापकालाच धमकी; 20 कोटींची मागणी

vijay sharma
vijay sharma

नवी दिल्ली : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना धमकावून 20 कोटींची मागणी केल्याप्रकरणी त्यांची महिला सचिव, तिचा पती व एका सहकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ग्राहकांची वैयक्तीक माहिती लिक करू अशी धमकी देऊन या तिघांनी 20 कोटींची मागणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीतील नोएडामधील पेटीएमच्या मुख्यालयात ही घटना घडली. 'ग्राहकांची सर्व माहिती लिक करू तसेच त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल,' अशी धमकी देत शर्मा यांच्या महिला सचिवाने 20 कोटींची मागणी केली. या कटात तिचा पती रूपक जैन व पेटीएममधील कर्मचारी देवेंद्र कुमार हे सहभागी होते, तर रोहित चोमल याने धमकीचा फोन विजय शर्मांचे भाऊ अजय शर्मा यांना केला होता. महिला सचिव ही या सर्व कटाची सूत्रधार होती. 

यानंतर ही सर्व माहिती अजय शर्मा यांनी पोलिसांना कळविली व महिलेसह इतर तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. 'पोलिसांच्या चौकशीनंतर जो काही निर्णय घेतला जाईल त्यावर कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवायचे की नाही, हे ठरवले जाईल,' अशी भूमिका पेटीएम कंपनीने घेतली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com