Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन

Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन

नवी दिल्ली : पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांना दक्षिण दिल्लीमधील डीसीपीच्या कारला धडक दिल्याच्या आरोपाखाली फेब्रुवारी महिन्यामध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज जामीनावर सोडण्यात आलंय.

Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन
धक्कादायक! सौदी अरेबियात एकाच दिवसात ८१ जणांना फाशी

दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्त बेनिता मॅरी जॅकर यांच्या कारला फेब्रुवारी महिन्यामध्ये एका लक्झरी कारने टक्कर दिली होती. ही कर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा चालवत असल्याचा आरोप आाहे. या घटनेसंदर्भात डीसीपींच्या ड्रायव्हर कॉन्स्टेबलने केस दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा हे जग्वार लँड रोव्हर चालवत होते. त्यांनी 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण दिल्लीच्या जिल्हा पोलिस आयुक्तांच्या (डीसीपी) कारला धडक दिली. हा अपघात अरबिंदो मार्गावरील द मदर्स इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर घडला होता. त्यानंतर शर्मा यांना IPC कलम 279 (निष्काळजीपणे वाहन चालवणे) अंतर्गत अटक करण्यात आली. त्यावेळी डीसीपींचे ड्रायव्हर असलेले कॉन्स्टेबल दीपक कुमार यांनी एफआयआर दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com