बलात्काराच्या आरोपाखाली 'युपी'तील माजी आमदाराला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

उत्तर प्रदेशमधील माजी आमदार आणि पीस पक्षाचा प्रमुख मोहम्मद आयूब याला परिचारिकेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील माजी आमदार आणि पीस पक्षाचा प्रमुख मोहम्मद आयूब याला परिचारिकेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बावीस वर्षाच्या परिचारिकेवर बलात्कार केल्याचा आरोपाखाली मंगळवारी संध्याकाळी अलिगंज ठाणे येथून आयूबला अटक करण्यात आली. पीडित मुलीचे लिव्हर आणि किडनी खराब झाल्याने तिच्यावर लखनौतील द किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 24 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या भावाने आयूबविरुद्ध मादियॉन पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. आयूब पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता आणि उपचारादरम्यान तिला चुकीची औषधे दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी आयूबविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

Web Title: UP: Peace Party chief arrested for raping nursing student