'पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 31 जण जखमी झाले. आता या पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार आहे.

- संजू वर्मा, प्रवक्त्या, भाजप

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल काल (गुरुवार) सायंकाळी ऐन गर्दीच्यावेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 31 जण जखमी झाले. आता या पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी केले.

हिमालय पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी याबाबत शोक व्यक्त केला. मात्र, संजू वर्मा यांनी या दुर्घटनेसाठी पादचारी जबाबदार आहे, असे विधान केल्याने सोशल मीडियावरून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पूल कोसळण्याची घटना ही नैसर्गिक आहे. या घटनेशी सरकारचा काहीही संबंध नाही, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Pedestal Responsible for the Bridge Accident says Sanju Verma