आणखी एका पेलिकनचा प्राणी संग्रहालयात मृत्यू

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - बर्ड फ्लूमुळे राष्ट्रीय प्राणी संग्रहालय काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले असले तरी आज आणखी एका पेलिकनचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. आज सकाळी प्राणी संग्रहालयाच्या दरवाजातच पेलिकनची एक जोडी मरण पावल्याची आढळली. त्यातील एकाची आम्ही तपासणी केली आहे, असे प्राणी संग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नक्की किती पेलिकन मरण पावले यांची मोजणी चालू असल्याने त्यांचा नक्की आकडा आता सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बर्ड फ्लूने पेलिकन, बदक आणि पाणपक्षी मरण पावल्याचे आढळून आल्यानंतर कालपासून प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी 14 ते 17 ऑक्‍टोबरदरम्यान प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. 14 ऑक्‍टोबर रोजी दोन पाणपक्षी मरण पावले होते. त्यानंतर 15 ऑक्‍टोबरला 6, तर 17 ऑक्‍टोबरला आणखी एक पाणपक्षी मरण पावल्याचे आढळून आले आहे.

Web Title: pelican death in zoo

टॅग्स