आठवेळचा एव्हरेस्टवीर पेम्बा शेर्पा बेपत्ता 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

माऊंट एव्हरेस्टवर आठवेळा चढाई करणारा पेम्बा शेर्पा कराकोरम भागात 7672 मीटर उंचीवरील ससेर कांगडी पर्वतावर यशस्वी चढाई केल्यानंतर एका गिर्यारोहण पथकासमवेत परतताना बेपत्ता झाला. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दार्जिलिंगचा रहिवासी गिर्यारोहक शेर्पा शुक्रवारी एका हिमदरीत कोसळला.

दार्जिलिंग : माऊंट एव्हरेस्टवर आठवेळा चढाई करणारा पेम्बा शेर्पा कराकोरम भागात 7672 मीटर उंचीवरील ससेर कांगडी पर्वतावर यशस्वी चढाई केल्यानंतर एका गिर्यारोहण पथकासमवेत परतताना बेपत्ता झाला. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दार्जिलिंगचा रहिवासी गिर्यारोहक शेर्पा शुक्रवारी एका हिमदरीत कोसळला.

पेम्बाच्या पत्नीने सांगितले, की 13 जुलैपासून कुटुंबासमवेत त्याची कोणतीही चर्चा झाली नव्हती. आपल्या पतीला पुन्हा पाहण्यासाठी ती एखाद्या चमत्काराची अपेक्षा करत आहे. तिने सांगितले, की गेल्या शुक्रवारी तिबेटी पोलिसांच्या प्रतिनिधीने पेम्बा शेर्पा बेपत्ता असल्याची माहिती दिली. 

Web Title: Pemba Sherpa missing in the mountains