गोव्यात वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

महसूल खात्याशी निगडित बहुतेक सेवा आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार असून डिजिटल इंडियाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाउल ठरणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पणजी - सरकारी अधिकाऱ्यांनी जर निर्धारित वेळेत लोकांना सेवा दिली नाही, तर त्यांना दंड केला जाईल, असे आज (बुधवार) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.

ई-डिस्ट्रिक्ट पोर्टलच्या उद्धाटनप्रसंगी बोलताना पर्रिकर यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. सरकारी कामासाठी जनतेला सरकारी कार्यालयांमध्ये पुन्हा पुन्हा खेपा माराव्या लागू नये यासाठी सर्वसामान्य जनतेशी निगडित कामे ऑनलाइन पद्धतीने नियोजित वेळेत पूर्ण करून दिली जाणार असून त्याचाच भाग म्हणून हे पोर्टल आजपासून जनतेच्या सेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. यावेळी महसुल मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. डिजिटल इंडिया अंतर्गत इ-डिस्ट्रिक्ट पोर्टल हा कार्यक्रम एमएमपी पद्धतीने राबवला जाणार आहे.

महसूल खात्याशी निगडित बहुतेक सेवा आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार असून डिजिटल इंडियाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाउल ठरणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. https://goaonline.gov.in या संकेतस्थळावर बहुतेक सेवाचा ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता येणार आहे.

Web Title: Penalties for officials not serving in time in Goa