तीन लाखांवरील रोखीच्या व्यवहारांवर 100 टक्के दंड: महसूल सचिव

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांकडे सरकारचा भर असून त्यासाठी कडक तरतुदी करण्यात येत आहेत. तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे रोखीचे व्यवहार करणाऱ्यांवर 100 टक्के दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अधिया बोलत होते. ते म्हणाले, 'एक एप्रिलनंतर समजा, तुम्ही 4 लाखाचा रोखीचा व्यवहार केलात, तर तुम्हाला त्यावर 4 लाख रुपये दंड आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही 50 लाख रुपयांचा रोखीचा व्यवहार केलात, तर तुम्हाला 50 लाख रुपयांचा दंड करण्यात येईल. हा दंड जो व्यक्ती रक्कम स्वीकारत आहे त्याच्याकडून वसूल केला जाईल.'

या तरतुदीमुळे मोठ्या रकमेच्या रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणातील काळा पैसा बाहेर आला आहे. आता सरकार यापुढे काळा पैसा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अधिया यांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करत या निर्णयामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचे म्हणत रिझर्व्ह बॅंकेऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नोटाबंदीबाबतचे निर्णय घेतल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एका चर्चासत्रात बोलताना केला.

Web Title: Penalty of equal amount for receiving cash over Rs 3 lakh: Hasmukh Adhia