राज ठाकरेंचे स्वप्न कमलनाथांकडून पूर्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

रोजगार उत्तरप्रदेश बिहारचे तरूण पटकावतात. स्थानिक बेरोजगारच राहतात ही राज ठाकरेंची भूमिका कायम राहिलेली आहे. पण, महाराष्ट्रात असा नियम करण्यात आलेला नाही. पण, आता हे काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याने करून दाखविले आहे.

भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण, कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्योजकांना इशारा देत 70 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आदेश दिले आहेत.

उद्योजकांनी 70 टक्के नोकऱ्या स्थानिक युवकांनाच दिल्या तर ठीक आहे नाही तर आम्ही राज्य सरकारकडून दिली जाणारी सबसिडी आणि इतर सवलती देणार नाही ! आमची सबसिडी   घेता आणि नोकऱ्या बिहार आणि बाहेरच्या प्रांतातून येणाऱ्या लोकांना देता हे खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दमच कमलनाथ यांनी जाहीरपणे उद्योगपतींना भरला आहे. 

एक काँग्रेसचा नेता आणि एक काँग्रेस पक्षाचा जबाबदार मुख्यमंत्री हे बोलतोय. कमलनाथ हे स्वतः मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या २३ कंपन्या संस्था आहेत. शेकडो कोटींचा त्यांचा कारभार त्यांची दोन मुले पाहतात. स्वतः एक उद्योजक असून ते जर असे बोलतात तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाच राज ठाकरे का चालत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणार आहे . 

रोजगार उत्तरप्रदेश बिहारचे तरूण पटकावतात. स्थानिक बेरोजगारच राहतात ही राज ठाकरेंची भूमिका कायम राहिलेली आहे. पण, महाराष्ट्रात असा नियम करण्यात आलेला नाही. पण, आता हे काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याने करून दाखविले आहे.

सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी 
सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन पाळत कॉंग्रेसने मध्य प्रदेशात सोमवारी कारभाराला प्रारंभ केला. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा आदेश कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जारी केला.

Web Title: People from Bihar UP come to MP but locals dont get jobs here says CM Kamal Nath