चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

अंबिकापूर येथे सभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'सरकार हे फक्त श्रीमंतांचे नसते, ते गरीबांचेही असते. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मंत्र असून, आम्हाला भाजपाला मतदान न करणाऱ्यांचाही विकास करायचा आहे. काही लोकांना आधी वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाकडे आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे. देशातील चार पिढ्यांनी काँग्रेसचा अनुभव घेतला आहे. आधी तुम्ही या चार पिढ्यांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा, मग मी चार वर्षांचा हिशोब देईन.'

'लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी अंबिकापूरमध्ये आलो त्यावेळी तुम्ही माझ्या सभेसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. पण हे पाहून काही लोकांना खरे वाटले नव्हते. मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण करु शकतात, हा विचारही लोक कसा करु शकतात, असा प्रश्न काही लोकांना पडला होता. अशा लोकांना उत्तर देण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळत आहे. छत्तीसगड राज्याची स्थापना झाली त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण छत्तीसगडाची स्थापना होताच येथील जनतेने भाजपाला निवडून दिले. हा तुमचा भाजपावरील विश्वास होता. इथे बसलेली एकही व्यक्ती नोटाबंदीमुळे रडत नाहीये, पण एका कुटुंबाचे नोटाबंदीवरुन रडगाणं सुरु आहे. जे लुटलंय ते देशात परत आले पाहिजे. तुम्ही काहीही करा, पण मोदी थांबणार नाही,' असेही मोदी म्हणाले.

Web Title: People disproved that it was right of only one family to speak from Red Fort says PM Modi