मोदींच्या नेतृत्त्वावर दिल्लीकरांचा विश्‍वास : हर्षवर्धन

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

आतापर्यंत हाती आलेले कल खालीलप्रमाणे

 • उत्तर दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 103)
  भाजप - 70; आप - 17; कॉंग्रेस - 12; अन्य - 4
 • पूर्व दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 63)
  भाजप - 41; आप - 9; कॉंग्रेस - 10; अन्य - 3
 • दक्षिण दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 104)
  भाजप - 71; आप - 15; कॉंग्रेस - 13; अन्य - 5

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरु झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या कलानुसार भारतीय जनता पक्ष तीनही महानगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर दिल्लीकरांचा विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना हर्षवर्धन म्हणाले, "प्रसारादरम्यान मला जे काही दिसले तेच मला मतमोजणीदरम्यान आतापर्यंत आलेल्या कलामध्ये दिसत आहे. जनतेचा भारतीय जनता पक्षाची धोरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे. या विजयाचे श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि विशेषत: मोदीजींना जाते. दिल्लीकरांनाही या यशाचे श्रेय जाते.'

तर केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनीही अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते म्हणाले, "ही नवी पहाट आहे. मात्र नवे आव्हानही आहे. आमच्यासमोर दिल्लीमध्ये आणखी काम करण्याचे आव्हान आहे. सर्वप्रथम स्वच्छता या विषयाला प्राधान्य आहे. आमच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. मला आशा आहे की दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिका एकत्र काम करण्याची ही नवी सुरूवात असेल.'

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिल्लीतील तीन महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे.

आतापर्यंत हाती आलेले कल खालीलप्रमाणे

 • उत्तर दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 103)
  भाजप - 69; आप - 18; कॉंग्रेस - 12; अन्य - 4
 • पूर्व दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 63)
  भाजप - 42; आप - 10; कॉंग्रेस - 8; अन्य - 3
 • दक्षिण दिल्ली महानगरपालिका (एकूण जागा 104)
  भाजप - 72; आप - 14; कॉंग्रेस - 13; अन्य - 5
Web Title: People have faith in PM's leadership : Harshvardhan