मनमोहन यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानांची कमतरता - केजरीवाल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, गुरुवारी मनमोहन सिंग सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. केजरीवाल आज मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत. परंतु, २०१३ मध्ये मात्र दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत मनमोहन यांना धारेवर धरले होते.

रुपयाचे मूल्य कमी होत असल्याच्या विषयावरील वॉल स्ट्रिट पत्रिकेतील एक बातमी केजरीवाल यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी, लोकांना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असून, आपला पंतप्रधान सुशिक्षित असला पाहिजे असे लोकांना वाटत असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनीही याआधी मोदींच्या शैक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान, सध्या दिल्लीतील पाणी प्रश्नाबाबत "गलिच्छ राजकारण" खेळत असल्याचाही आरोप मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केला. भाजप दिल्लीकरांसोबत गलिच्छ राजकारण खेळत आहे. दिल्लीला गेले 22 वर्षे पाणी मिळत होते. अचानक, हरियाणातील सध्याच्या भाजपा सरकाराने या पुरवठ्यात कपात का केली ? असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे. 

Web Title: people missing educated pm like manmohan singh says kejariwal