जयललितांच्या मृत्यूनंतर अनेकांकडून मुंडन

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर अनेकांना शोक अनावर झाला असून, त्यांच्यावरील प्रेमापोटी खासदार, आमदार, नागरिकांसह अनेक महिला मुंडन करू लागल्या आहेत.

जयललिता (वय 68) यांचे सोमवारी (ता. 5) रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. त्याआधी 74 दिवस त्यांची अपोलो रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. तीन दशके त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणावर अधिराज्य गाजविले. देशाच्या राजकारणातही त्यांनी तितक्‍याच ताकदीने छाप उमटविली. गरीब जनतेसाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे "अम्मा' सामान्य नागरिकांत अफाट लोकप्रिय ठरल्या.

तमिळ जनतेच्या लाडक्‍या 'अम्मा' यांच्यावर मंगळवारी (ता. 6) शासकीय इतमामात मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तमिळनाडूच्या विविध भागांमधून लाखो नागरिक आले होते. 'अम्मा'च्या प्रेमापोटी अनेकजण आज (बुधवार) सकाळपासून मुंडन करू लागले आहेत. यामध्ये खासदार, आमदार, नागरिक व महिलांचा समावेश आहे. नागरिकांनी मुंडन करण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लावल्या आहेत. यामध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे.

राज्यात सात दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. 'अम्मा' गेल्यामुळे आम्ही पोरके झालो आहोत. 'अम्मा' या नेत्या नव्हत्या तर त्या आमच्या घरातील सदस्या होत्या. त्यांच्या प्रेमापोटीच आम्ही मुंडन करत आहोत. त्यांनी आमच्यासाठी आयुष्य खर्ची केले आहे, असे त्यांच्या चाहत्यांनी सांगितले.

Web Title: People Tonsure Head as Mark of Respect to Jayalalithaa