चीनने आशियात गुंतवणूक वाढवली; भारतातल्या बँकेचे खरेदी केले 1.75 कोटी शेअर्स!

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील शेअर बाजारात भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने आशियातील प्रमुख देशांच्या कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे.

नवी दिल्ली : जगभरात सगळीकडे कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसले आहेत. अशा परिस्थितीत आशिया खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनने जगभरातील घसरत चाललेल्या स्टॉक मार्केटचा फायदा उठविण्यास सुरवात केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गृहनिर्माण कर्ज देणारी देशातील प्रमुख बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे १.७५ कोटी शेअर चीनने खरेदी केले आहेत. शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, चीनमधील केंद्रीय बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीचे १,७४,९२,९०९ शेअर खरेदी केले आहेत. जे कंपनीचे एक टक्का भागभांडवल आहे. 

- अशा खडतर परिस्थितीत सरकारला मदत करायला तयार : रघुराम राजन

एचडीएफसीचे शेअर स्वस्त झाले होते

कोरोना व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढल्याने शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे एचडीएफसी लिमिटेडचे शेअर्स झपाट्याने घसरले होते. याचा फायदा चीनने उचलला आणि एचडीएफसीचे १.७५ कोटी शेअर खरेदी केले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत शेअरमध्ये ४१ टक्क्यांची घसरण नोंदविली गेली आहे. 

- Coronavirus : बाळाला जन्म देऊन २२ दिवसांत कामावर रुजू झाल्या आयुक्त

१.०१ टक्क्यांनी वाढला चीनचा वाटा

एचडीएफसी लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी म्हटले आहे की, मार्च 2019 पर्यंत एचडीएफसी कंपनीत पीपल्स बँक ऑफ चायनाची ०.८० % हिस्सेदारी होती, त्यामध्ये वाढ होऊन मार्च 2020 मध्ये ती १.०१ % पर्यंत पोहोचली आहे. 

- Coronavirus : पीएम केअरला केलेली मदतच सीएसआरमध्ये; सीएम केअरचा समावेश नाही

आशियाई बाजारात चीनची वाढती गुंतवणूक

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील शेअर बाजारात भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने आशियातील प्रमुख देशांच्या कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये चीनने पाकिस्तान आणि बांगलादेशसह इतर आशियाई देशांमध्ये विशेषत: पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणुकीत वाढ केली आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples Bank of China purchases 1 Crore 75 lakh shares in HDFC