देशातील जनतेचा मोदींवर विश्‍वास: भाजप

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यावर टीका करत सिब्बल यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असून देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यावर टीका करत सिब्बल यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असून देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मिनाक्षी लेखी म्हणाल्या, "आपल्याला सिब्बल यांच्यावर विश्‍वास ठेवण्याची गरज नाही. जर विरोधकांनी सरकारवर विश्‍वास ठेवला तर त्यात काहीतरी चूक आहे असे वाटते.' तसेच देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असून सिब्बल यांनी राज्यशास्त्र पुन्हा एकदा वाचण्याची गरज असल्याचा सल्लाही दिला. शुक्रवारी सिब्बल यांनी मोदींवर निशाणा साधत "मोदीजी यांनी 80 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी हे आश्‍वासन पूर्ण केले आहे का? नाही. दोन वर्षे होऊन गेले. आपण अशा पंतप्रधानावर विश्‍वास ठेवू शकत नाही.' तसेच "केवळ भाषण आणि रिकाम्या आश्‍वासनांवर सरकार चालत नाही' अशी टीकाही सिब्बल यांनी केली होती.

"देशातील 80 कोटी जनतेची कमाई 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्याकडे काय काळा पैसा आहे? त्या लोकांचे बॅंकेत खातेही नाही. त्यांच्याकडे काही ओळखपत्रही नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे, बिहारमधून पंजाबमध्ये आलेले विस्थापित कामगार आहेत. ते 200-500 रुपये कमावतात. त्यांनी काय करायचे? त्यांच्या कुटुंबियांनी काय करायचे?' असे प्रश्‍नही सिब्बल यांनी उपस्थित केले होते.

Web Title: Peoples of this country trusts Modi: BJP