पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रॅलीला अखेर परवानगी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कोलकाता : भाजपकडून पश्चिम बंगाल राज्यात तीन रथ रात्रा काढण्यात येणार आहेत. ही रथ यात्रा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केली जाणार आहे. या रथ यात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने 'हिरवा कंदील' दिल्याने राज्यात होणाऱ्या रथयात्रेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

भाजपच्या या रथयात्रेला पश्चिम बंगाल सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली होती. भाजपच्या रथयात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, असा अहवाल गुप्तचर संस्थांकडून देण्यात आला होता. त्यामुळे या यात्रेला परवानगी नाकारली होती असे आज पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने वकिलाने न्यायालयात सांगितले.  राज्य सरकारच्या या विरोधानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यावर आज न्यायालयाने भाजपला दिलासा देत भाजपच्या या रॅलीला परवानगी दिली आहे. 

Web Title: Permission to BJPs rally in West Bengal