मरीना बीचवरील अंत्यविधीच्या परवानगीनंतर करूणानिधींच्या मुलांना अश्रू अनावर

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नंतर करूणानिधींचा मुलगा एम, के. स्टॅलिन, अलागिरी व मुलगी कनिमोळी यांना अश्रू अनावर झाले. तर राजाजी हॉलबाहेर जमलेल्या समर्थकांनी नारेबीजी केली.

चेन्नई : पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले व डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करूणानिधी यांचे काल (ता. 7) चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी कुटूंबियांनी व डीएमके पक्षाने मरीना बीचवरील जागेची मागणी केली होती, पण तमिळनाडू राज्य सरकारने ती फेटाळली. त्यामुळे कुटूंबिय मद्रास उच्च न्यायालयात गेले व उच्च न्यायालयाने अंत्यसंस्कार करण्यासाठी मरीना बीचवरील जागेची परवानगी दिली. या निर्णयानंतर करूणानिधींच्या नातेवाईकांना व समर्थकांना अश्रू अनावर झाले.

'करुणानिधी यांच्या पार्थिवावर त्यांचे राजकीय गुरु अन्नादुरै यांच्या स्मृतिस्थळाशेजारीच अंत्यसंस्कार करू द्यावेत,' असा भावनिक युक्तिवाद डीएमकेने न्यायालयासमोर मांडला. तसेच माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अंत्यविधीला मरीना बीचवर परवानगी दिली व करूणानिधींच्या अंत्यविधीला का नाही, असाही सवाल उपस्थित करण्यात आला. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नंतर करूणानिधींचा मुलगा एम, के. स्टॅलिन, अलागिरी व मुलगी कनिमोळी यांना अश्रू अनावर झाले. तर राजाजी हॉलबाहेर जमलेल्या समर्थकांनी नारेबीजी केली.

Web Title: permission for karunanidhi last ritual on marina beach family get emotional