Naxal Attack : नक्षलवाद्यांवर आता कडक कारवाई होणार; खुद्द पंतप्रधान मोदींचेच संकेत!

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : 'भारताच्या शूर पुत्रांचे बलिदान कधीही वाया जाणार नाही. अशा घृणास्पद हिंसाचाराच्या सूत्रधारांना आता मोकळे सोडणार नाही', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) नक्षलवाद्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले. गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान १५ जवान हुतात्मा झाले.

महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या सी-६० कमांडोंच्या पथकावर हल्ला केला. जवानांच्या हालचालींची गोपनीय माहिती फुटल्याने नक्षलवाद्यांचे फावले, अशी प्रतिक्रिया प्रशासनाद्वारे व्यक्त करण्यात आली. 

या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातील सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध! देशासाठी बलिदान देणार्‍या या शूर पुत्रांना आम्ही वंदन करतो. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. या कृत्याच्या सूत्रधारांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.''

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या घटनेनंतर तातडीने महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधला. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करत आहे', असे राजनाथसिंह यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com