मुस्लिम डिलिव्हरी बॉय आल्याने ऑर्डर स्वीकारण्यास नकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

स्विगीकडून प्रकरणाचा निषेध

हैदराबाद : आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ ऑर्डर करतो. ऑर्डर केलेले पदार्थ स्वीकारतोही. मात्र, हैदारबादमध्ये एक भलताच प्रकार घडला. पार्सल घेऊन आलेला डिलिव्हरी बॉय हा मुस्लिम असल्याने संबंधित ग्राहकाने ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. ही ऑर्डर स्विगीवरून करण्यात आली होती.

याबाबत डिलिव्हरी बॉयने सांगितले, की एका ग्राहकाने जेवणाची ऑर्डर स्विगीवरून केली. मी डिलिव्हरी देण्यास गेलो असता त्याने जात विचारली, तेव्हा मी मुस्लिम असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी जेवण स्वीकारण्यास नकार दिला. या अनपेक्षित प्रकारानंतर संबंधित डिलिव्हरी बॉयने या प्रकरणाची तक्रार मुस्लिम संघटना 'मजलिस बचाओ तहरिक'चे अध्यक्ष अमजद उल्ला खान यांच्याकडे केली. त्यानंतर उल्ला खान यांनी याबाबतची माहिती ट्विटवरून दिली. 

दरम्यान, याप्रकरणी संबंधित ग्राहकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक पी. श्रीनिवास अधिक तपास करत आहेत. 

स्विगीकडून प्रकरणाचा निषेध

ग्राहकाने ऑर्डर घेण्यास नकार दिला. त्यानंतर स्विगीनेही या प्रकरणाचा निषेध नोंदवला. आम्ही प्रत्येक धर्म आणि विचारांचा आदर करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Person not Accepted his Order because of Muslim Delivery Boy