स्वतःच्या फिटनेसपेक्षा राज्याच्या फिटनेसला कुमारस्वामींची पसंती 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. मात्र आपल्याला स्वतःच्या फिटनेसपेक्षा राज्याच्या फिटनेसची जास्त काळजी असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. 

बंगळूरु - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. मात्र आपल्याला स्वतःच्या फिटनेसपेक्षा राज्याच्या फिटनेसची जास्त काळजी असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. 

कुमारस्वामी यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना ट्विट करत म्हटलं आहे की, 'मोदी तुम्ही माझ्या तब्बेतीची काळजी केलीत, त्याबद्दल धन्यवाद. फिटनेस खूप महत्वाचे आहे. मी रोज योगा-ट्रेडमिल करतो आणि तो माझ्या व्यायामाचा भाग आहे. पण मला माझ्या फिटनेसपेक्षा सध्या माझ्या राज्याच्या फिटनेसची जास्त काळजी आहे आणि त्यासाठी तुम्ही पाठिंबा द्याल अशी अपेक्षा आहे'.

काही दिवसापूर्वी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी होताना विराट कोहली याने नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज केले होते. त्याच्या प्रत्युत्तरात मोदींनी आपले फिटनेस चॅलेंज पुर्ण करुन कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिकाला फिटनेस चॅलेंज दिले होते. नरेंद्र मोदी यांनी क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी होत आपला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

Web Title: Personal fitness vs fitness of state, Karnataka CM Kumaraswamy replies to PM Modi's challenge