कसाबपेक्षा कुलभूषण मोठा दहशतवादी: मुशर्रफ

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या दहा दहशतवाद्यांमध्ये कसाब हा एक प्यादा होता. तर, कुलभूषण हा हेरगिरी करणारा होता. ज्यामुळे अनेक नागरिक ठार झाले असते.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाबपेक्षा मोठा दहशतवादी असल्याचा, आरोप पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा दिल्यानंतर भारताने आंतररराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या फाशीवर स्थगिती आणण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने आता कुलभूषण जाधव यांना मोठा दहशतवादी ठरविण्यास सुरवात केली आहे. मुशर्ऱफ यांनी जाधव यांच्या तुलना थेट कसाबशी करत कसाबपेक्षा ते दहापट मोठे असल्याचे म्हटले आहे.

मुशर्रफ यांना एआरवाय वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे, की मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या दहा दहशतवाद्यांमध्ये कसाब हा एक प्यादा होता. तर, कुलभूषण हा हेरगिरी करणारा होता. ज्यामुळे अनेक नागरिक ठार झाले असते. हेरगिरीमुळे कुलभूषण अनेक नागरिकांच्या मृत्यूचे कारण झाला आहे. पाकिस्तानने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायला नको होतो. कारण, हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही.

Web Title: Pervez Musharraf says Kulbhushan Jadhav is a bigger terrorist than Ajmal Kasab