पर्रीकरांना काय झालंय? जाहीर करा; न्यायालयात याचिका

Petition in Mumbai High Court to disclose health details of Manohar Parrikar
Petition in Mumbai High Court to disclose health details of Manohar Parrikar

पणजी : गेले नऊ महिने आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीची तपासणी करून अधिकृतरित्या माहिती जाहीर करण्याचा आदेश मुख्य सचिवांना द्यावा यासंदर्भातची याचिका सामाजिक कार्यकर्ते ट्रोजन डिमेलो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली आहे. ही याचिका येत्या सोमवारी सुनावणीस येण्याची शक्‍यता आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर त्यांच्या ताळगाव पठार येथील खासगी निवासस्थानी डॉक्‍टरांमार्फत उपचार सुरू आहेत. मंत्री तसेच पक्षाचे आमदार व पदाधिकारी यांच्याकडून पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले जाते; मात्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या गोमेकॉ इस्पितळाकडून कोणतीच माहिती उघड केली जात नाही.

त्यामुळे त्यांची प्रकृतीची तपासणी गोमेकॉ इस्पितळाच्या डॉक्‍टरांच्या पथकाकडून करून त्यांच्या आरोग्याच्या अहवाल सादर करण्याचा आदेश गोवा खंडपीठाने मुख्य सचिवांना द्यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com