पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 89 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 86 पैसे वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल. महिनाभरातील ही तिसरी दरवाढ आहे.

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 89 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 86 पैसे वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल. महिनाभरातील ही तिसरी दरवाढ आहे.

याआधी 15 ऑक्‍टोबरला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.34 रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.37 रुपये वाढ करण्यात आली होती. आता करण्यात आलेली ही पेट्रोलची 1 सप्टेंबरपासून झालेली सहावी दरवाढ आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तेल कंपन्यांनी राज्याचा अधिभार वगळून जाहीर केली आहे. जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव आणि डॉलर - रुपया विनिमयाच्या दरावर पेट्रोल व डिझेलचे भाव अवंलबून असून त्यानुसार त्यात चढउतार होत आहेत.

Web Title: petro, diesel rate increase