गाडीत पेट्रोल भरण्याअगोदर जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईल स्वस्त झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते, पण विविध राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच ४ मे पासून सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यास सुरवात केली.
Petrol-Diesel
Petrol-DieselGoogle file photo
Summary

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईल स्वस्त झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते, पण विविध राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच ४ मे पासून सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यास सुरवात केली.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतींमुळे सामान्य नागरिकांच्या समोरील अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला आहे. गेल्या ७ दिवसांमध्ये पेट्रोल १.६५ रुपयांनी महागलं असून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९२ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेल ८२.६१ रुपयांवर पोहोचलं आहे. (Petrol and diesel latest updates today 12 May 2021 check price)

Petrol-Diesel
लहान मुलांसाठी लस; भारतात क्लिनिकल चाचणीसाठी मंजूरी

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईल स्वस्त झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते, पण विविध राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच ४ मे पासून सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यास सुरवात केली. गेल्या सात दिवसांत पेट्रोल १.६५ रुपयांनी तर डिझेल १.८८ रुपयांनी महाग झालं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी पेट्रोलने याआधीच शंभरी ओलांडली आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचे दर १००.०८ रुपये प्रति लिटर आहेत.

Petrol-Diesel
पुण्यात साधे पेट्रोलही शंभर रुपयांच्या घरात

मुंबईत पेट्रोल लवकरच ओलांडणार शंभरी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लवकरच शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ९८.३६ रुपये आणि ८९.७५ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ९२.१६ रुपये तर डिझेल ८५.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल ९३.८४, तर डिझेल ८७.४९ रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहे.

दर वाढण्यास कारण की

ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च नोंद झाली होती. त्यावेळी क्रुड ऑईल ८० डॉलर प्रति बॅरल होते. सध्या क्रुड ऑईलची किंमत ६८ डॉलर प्रति बॅरल आहे. तरीही तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करत आहेत.

Petrol-Diesel
आदर्शवत नर्स! मूकबधिर रुग्णांसाठी ऑनलाइन शिकली सांकेतिक भाषा

दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होतात. सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या दरांमध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींची भर पडताच त्याचे दर जवळपास दुप्पट होतात. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज बदल होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com