भाजपच्या कार्यालयावर बॉंबहल्ला 

भाजपच्या कार्यालयावर बॉंबहल्ला 

शिलॉंग- शिलॉंगमधील भाजपच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री बॉंबहल्ला केला. यात कार्यालयाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. 

नागरिकत्व विधेयक मंजूर करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचा निषेध म्हणून ईशान्य भारत विद्यार्थी संघटनेने मंगळवारी (ता. 8) "ईशान्य बंद'चे आयोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यालयावर हा हल्ला झाला असून त्याची चौकशी सुरू केली असल्याचे पूर्व खासी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डेव्हिस एन. आर. मराक यांनी सांगितले. या कार्यालयात सीसीटीव्ही नसल्याने हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांवर निर्भर आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष शिबून लिंगडोह म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com