दिवाळीपर्यंत पेट्रोल, गॅसच्या किंमती कमी होतील: प्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव घसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे रिफायनरी तेलाचे भाव वाढले होते. येत्या काळातही हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरच्या किंमतींनी उच्चांक गाठल्याने केंद्र सरकारवर टीका होत असताना आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिवाळीपर्यंत किंमती कमी होतील असे आश्वासन दिले आहे.

गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या मनात बराच रोष निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अखेर मंत्री प्रधान यांनी दिवाळीपर्यंत किंमती कमी होतील असे आश्वासन दिले आहे.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, की येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव घसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे रिफायनरी तेलाचे भाव वाढले होते. येत्या काळातही हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर सुद्धा जीएसटी कर लागू होण्याची शक्यता असून, त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. 

Web Title: Petrol, diesel, other fuel prices may come down by Diwali: Pradhan