इंधन दरवाढीचा शॉक

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

डिझेल 14, तर पेट्रोल 13 पैशांनी महाग

नवी दिल्ली: चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे खनिज तेलाची आयात महागली असून, परिणामी आज डिझेल दरात 14, तर पेट्रोल दरात 13 पैशांची वाढ करण्यात आली. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत डिझेलचा दर 69.46 रुपये प्रतिलिटरवर पोचला असून, ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे.

दिल्लीत इतर शहरांच्या तुलनेत इंधनावर कमी विक्रीकर आकारला जातो. त्यामुळे इंधन दरात वाढ झाली असली तरी, इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत दिल्लीतील इंधनाचे दर कमी आहेत. यापूर्वी 29 मे रोजी दिल्लीत डिझेलचा दर 69.31 रुपये प्रतिलिटर या उच्चांकी पातळीवर पोचला होता. मुंबईत डिझेलचा दर 73.74 रुपये प्रतिलिटर असा आहे.

दरम्यान, नवीन दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 77.91 रुपये, तर मुंबईत तो 85.33 रुपये प्रतिलिटरवर पोचला आहे. यापूर्वी 29 मे रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 78.43 रुपये, तर मुंबईत 86.24 रुपये प्रतिलिटर या उच्चांकी पातळीवर पोचला होता.

Web Title: petrol diesel price hike