पेट्रोल डिझेल पुन्हा महागलं

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आजपासून दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत १७ पैशांची वाढ केली आहे तर चेन्नईमध्ये १८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता या नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ८२.६५ रुपये, दिल्लीमध्ये ७४.८० चेन्नईमध्ये ७७.६१ रुपये आणि कोलकत्यामध्ये ७७.५० रुपये रुपये प्रतीलिटर झाले आहेत.

नवी दिल्ली - कर्नाटक निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेल तब्बल 19 दिवसानंतर पुन्हा महागले आहे. आज (ता.14) तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. एप्रिल महिन्यात तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत होती. परंतु, कर्नाटक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीत स्थैर्य आल्याचे आढळून आले होते. परंतु, कर्नाटक निवडणुका संपताच तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल १७ पैसे तर डिझेल २3 पैसे महागले आहे. तर दिल्ली, कोलकत्यासह सर्व शहरांमध्ये पेट्रोलचे भाव वाढले आहेत. 12 मे ला कर्नाटकमधील मतदान संपल्यावर लगेच तेलाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही गुजरात निवडणुकीनंतर तेलाच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आजपासून दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत १७ पैशांची वाढ केली आहे तर चेन्नईमध्ये १८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता या नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ८२.६५ रुपये, दिल्लीमध्ये ७४.८० चेन्नईमध्ये ७७.६१ रुपये आणि कोलकत्यामध्ये ७७.५० रुपये रुपये प्रतीलिटर झाले आहेत.

Web Title: Petrol Diesel Price Hike After Karnataka Elections