दक्षिण आशियामध्ये भारतात सर्वांत महाग इंधन 

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

दिल्लीतील प्रतिलिटरचे दर 
पेट्रोल 

- 1 एप्रिल : 73.73 रुपये 
- 14 सप्टेंबर 2014 : 76.06 रुपये 
डिझेल 
- 1 एप्रिल : 64.58 रुपये 
- 7 फेब्रुवारी 2018 : 64.22 रुपये 

नवी दिल्ली : दिल्लीत पेट्रोलचा दर रविवारी चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचला. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.73 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 64.58 रुपयांवर गेला. दक्षिण आशियाई देशात भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावएवढाच कर त्यावर आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी जूनपासून इंधनाचे दर रोज बदलण्याचे धोरण स्वीकारले आहे. दिल्लीत पेट्रोल व डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 18 पैसे वाढ झाली. यामुळे आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.73 रुपये झाला. याआधी 14 सप्टेंबर 2014 रोजी पेट्रोलचा दर 76.06 रुपये या उच्चांकी पातळीवर पोचला होता. डिझेलचा दर आज प्रतिलिटर 64.58 रुपयांवर गेला. याआधी डिझेलचा दर या वर्षी 6 फेब्रुवारीला 64.22 रुपये या उच्चांकी पातळीवर पोचला होता. 

या वर्षाच्या सुरवातीला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची मागणी पेट्रोलियम मंत्रालयाने केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे भाव वाढत असल्याने त्याच्या ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी ही भूमिका घेतली होती. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या मागणीकडे दुर्लक्ष केले.  

दिल्लीतील प्रतिलिटरचे दर 
पेट्रोल 

- 1 एप्रिल : 73.73 रुपये 
- 14 सप्टेंबर 2014 : 76.06 रुपये 
डिझेल 
- 1 एप्रिल : 64.58 रुपये 
- 7 फेब्रुवारी 2018 : 64.22 रुपये 

Web Title: Petrol, Diesel price hike in India