पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा आणखी भडका 

Petrol, diesel price regularly hike
Petrol, diesel price regularly hike

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, तेल कंपन्यांनी यावर फुंकर मारण्याऐवजी दरवाढीचे मीठ चोळले आहे. पेट्रोलच्या दरात शनिवारी प्रतिलिटर 39 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 44 पैसे वाढ करण्यात आली. 

सर्वाधिक वाढीचा पंधरवडा 
ऑगस्ट मध्यापासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.24 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.64 रुपये वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाचे अवमूल्यन याला कारणीभूत ठरले आहे. इंधनदर दररोज बदलण्यास मागील वर्षी जूनच्या मध्यापासून सुरवात झाली. तेव्हापासून एका पंधरवड्यात झालेली ही सर्वांत मोठी दरवाढ आहे. 

मुंबईत सर्वाधिक कर 
देशातील सर्व महानगरांमध्ये दिल्लीत इंधनावरील कर कमी असल्यामुळे दर कमी आहेत. याउलट मुंबईत सर्वाधिक कर असल्याने इंधन दर जास्त आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री किमतीपैकी निम्मी रक्कम ही केंद्र व राज्य सरकारचा कर आहे. याचवेळी केंद्र सरकारने मात्र, इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सामान्य जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहेत. 

विरोधी पक्षांचा 10 ला बंद 
विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरोधात 10 सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. माजी अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारने इंधनावरील करात कपात करावी, अशी मागणी नुकतीच केली होती. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ प्रामुख्याने जादा करांमुळे आहे. कर कमी केल्यास दर कमी होईल, असे त्यांनी नमूद केले होते. 

पेट्रोल (प्रतिलिटर/रुपये) 
दिल्ली : 80.38 
मुंबई : 87.77 
डिझेल (प्रतिलिटर/रुपये) 
दिल्ली : 72.51 
मुंबई : 76.98 

भारताला पहिला तेल धक्का 45 वर्षांपूर्वीच बसला होता. त्याचवेळी इंधनस्रोत बदलण्याचा विचार भारताने करणे आवश्‍यक होते. सध्याची परिस्थिती पाहता जैविक इंधनाकडे पर्यायी स्रोत म्हणून पाहायला हवे. 
- सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com