एकच नंबर! पेट्रोल झालं स्वस्त, नवे दर बघा....

वृत्तसंस्था
बुधवार, 11 मार्च 2020

तेल उत्पादनावरून सौदी अरेबिया व रशियामध्ये मोठा वाद सुरू आहे. रशियाला अडचणीत आणण्यासठी सौदीने तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र रशिया सौदीला तेल उत्पादन करण्यास अडकाठी करत असल्याने या दोन देशांमध्ये किंमतीवरून वाद सुरू आहे.

नवी दिल्ली : सौदी अरेबिया व रशियामधील कच्च्या तेलाच्या वादामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत एका लिटरवर २.६९ रूपये तर डिझेलच्या किंमतीवर २.३३ रूपयांची घसरण झाली आहे. जवळपास तीन रूपयांची घसरण झाल्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत ७०.२९ रूपये व डिझेलची किंमत ६३.०१ रूपये प्रति लिटर आहे. 

"देशात पेट्रोल ५० रूपयांवर येणार?; दोघांची भांडणं भारताचा फायदा

तेल उत्पादनावरून सौदी अरेबिया व रशियामध्ये मोठा वाद सुरू आहे. रशियाला अडचणीत आणण्यासठी सौदीने तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र रशिया सौदीला तेल उत्पादन करण्यास अडकाठी करत असल्याने या दोन देशांमध्ये किंमतीवरून वाद सुरू आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० टक्क्याने घसरण झाली आहे. भारताला याचा फायदा होऊ शकतो व पेट्रोलचे दर ५० रूपयांपर्यंत येऊ शकतात. मात्र सध्या दिल्लीत पेट्रोल २.६९ रूपयांनी स्वस्त झाले आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या मुंबईत पेट्रोलचा दर ७५.९९ रुपये प्रति लिटर व डिझेल ६५.९७ रुपये प्रति लिटरने असा आहे. तर, कोलकाता व चेन्नई येथे पेट्रोल अनुक्रमे ७२.९८ व ७३.०२ रुपये लिटर तर डिझेल ६५.३५ व ६६.४८ रुपये प्रति लिटर विक्री केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Diesel prices decreases by 2 rs 69 paise in Delhi