पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 42 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.03 रुपयांची वाढ आज मध्यरात्रीपासून करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 42 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.03 रुपयांची वाढ आज मध्यरात्रीपासून करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या दर पंधरवड्याला पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव पाहून हा आढावा घेण्यात येतो. आज झालेली ही वाढ पेट्रोलच्या दरात झालेली सलग चौथी आणि डिझेलच्या दरात झालेली तिसरी ठरली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढू लागल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दरवाढ सुरू आहे.

Web Title: petrol diesel prices hiked