सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ

petrol-pump
petrol-pump

मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे. 

"इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'च्या दर पत्रकानुसार मुंबईत पेट्रोलचा दर 29 पैशांनी वधारून 78.39 रुपये प्रतिलिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रतिलिटर 20 पैशांची वाढ झाली असून मुंबईकरांना प्रतिलिटर 69.24 रुपये मोजावे लागत आहेत.

दिल्लीत पेट्रोल 72.71 रुपये आणि डिझेल 66.01 रुपये आहे. सौदी अरामकोच्या प्रकल्पांमधील कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागणार असून, इंधनातील वाढ कायम राहण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com