तमिळनाडूत पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

चेन्नई - तमिळनाडूमध्ये पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) वाढ करण्यात आल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.78 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 27 वरून 34 टक्के आणि डिझेलवरील व्हॅट 21.4 वरून 25 टक्के केला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे प्रतिलिटर 3.78 व 1.70 रुपये वाढ झाली आहे. तमिळनाडून पेट्रोलियम डिलर्स असोसिएशने सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. ही दरवाढ समाजातील सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम करणारी असल्याने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. मुरली म्हणाले, "पेट्रोलच्या दरवाढीमुळे दुचाकीधारकांना फटका तर डिझेलच्या दरवाढीमुळे पर्यायाने अनेक उत्पादनांचे भाव वाढणार आहेत. भाज्यांच्या वाहतुकीसाठी डिझेल मोटारींचा वापर होत असल्याने भाज्यांचे भाव वाढणार आहेत. चेन्नईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 75 रुपये आणि डिझेलचा दर 63.96 रुपयांवर गेला आहे. शेजारील केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पेट्रोल व डिझेल अनुक्रमे 68.13 व 60.18 रुपये प्रतिलिटर आहे.''

Web Title: Petrol, diesel rates increased in Tamilnadu