पेट्रोल आजही तब्बल 7 पैशांनी स्वस्त!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाल्याने किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा दिलासा खूपच तुटपुंजा असल्याने नागरिकांकडून नाराजी दर्शविण्यात येत आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलच्या दरात एक पैशाने कपात करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते.

नवी दिल्ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आज (गुरुवार) थोडाफार दिलासा मिळाला असून, पेट्रोलच्या दरात 7 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 5 पैशांनी कपात करण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाल्याने किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा दिलासा खूपच तुटपुंजा असल्याने नागरिकांकडून नाराजी दर्शविण्यात येत आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलच्या दरात एक पैशाने कपात करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते. यापूर्वी सलग सोळा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनानुसार दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतीलिटर 78.42 रुपयांवरून 78.35 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. डिझेलचे दर प्रतीलिटर 69.30 रुपयांवरून 69.25 खाली आल्या आहेत. 

कर्नाटकमध्ये मतदानाच्या वेळी निवडणुका येण्याआधी तीन आठवडे पेट्रोल डिझेल किंमतीत वाढ झाली नव्हती. मात्र, त्यानंतर सलग वाढ करण्यात आली होती. आज दरात घट झाल्यानंतर दिल्लीमध्ये ही घट प्रतीलिटर पेट्रोलसाठी 78.43 रुपये आहे. डिझेलसाठी 69.31 रुपये इतकी आहे. स्थानिक विक्री कर किंवा व्हॅटनुसार पेट्रोल डिझेलच्या किंमती त्या राज्यात वेगवेगळ्या असतात. दिल्लीतील सर्व महानगर आणि बहुतांश राज्यांमधील राजधान्यांपेक्षा स्वस्त किंमत आहे.

Web Title: Petrol price cut by 7 paise, diesel by 5 paise per litre