पेट्रोल आणखी 40 पैशांनी स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण कायम असून, तेल कंपन्यांनी इंधनदरात आज सलग दहाव्या दिवशी कपात केली. यामुळे पेट्रोल 40 पैसे तर, डिझेल 35 पैशांनी स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर 80.45 रुपये प्रतिलिटर असून, डिझेलची 74.38 रुपये दराने विक्री सुरु आहे.

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण कायम असून, तेल कंपन्यांनी इंधनदरात आज सलग दहाव्या दिवशी कपात केली. यामुळे पेट्रोल 40 पैसे तर, डिझेल 35 पैशांनी स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर 80.45 रुपये प्रतिलिटर असून, डिझेलची 74.38 रुपये दराने विक्री सुरु आहे.

मुंबईत पेट्रोल व डिझेलदरात अनुक्रमे 40 व 37 पैशांची कपात करण्यात आली. त्यामुळे पेट्रोलचा दर 85.93 रुपयांवर आला असून, नागरिकांना एकलिटर डिझेलसाठी 77.96 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, चेन्नईत पेट्रोलचा दर 83.60 रुपये प्रतिलिटर असून, कोलकातामध्ये त्याची 82.31 रुपये दराने विक्री सुरू आहे.

गेल्या 10 दिवसांत 
पेट्रोलमध्ये इतकी कपात 
दिल्ली ः 2.38 
मुंबई ः 2.36 
कोलकाता ः 2.34 
चेन्नई ः 2.50 
(आकडे रुपयांत) 

Web Title: Petrol prices cut by 40 paise per litre