पेट्रोल पंप, विमानतळांवर जुन्या नोटा बंद

पीटीआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा पेट्रोल पंपावर इंधन खरेदी आणि विमानतळांवर तिकिट खरेदीसाठी शनिवारपासून चालणार नाहीत. यासोबत महामार्गांवरील बंद केलेल्या टोलवसुलीचा उद्या (शुक्रवारी) अखेरचा दिवस आहे. 

नवी दिल्ली - जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा पेट्रोल पंपावर इंधन खरेदी आणि विमानतळांवर तिकिट खरेदीसाठी शनिवारपासून चालणार नाहीत. यासोबत महामार्गांवरील बंद केलेल्या टोलवसुलीचा उद्या (शुक्रवारी) अखेरचा दिवस आहे. 

सरकारने याआधी पेट्रोल पंपावर इंधन खरेदी, विमानतळांवर तिकिट खरेदीसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे म्हटले होते. तसेच, टोलवसुली 15 डिसेंबरपर्यंत बंद केली होती; मात्र सरकारने ही सवलत रद्द केली आहे. पेट्रोल पंप आणि विमानळांवर शनिवारपासून पाचशे रुपयांच्या नोटा चालणार नाहीत. तसेच, टोलवसुली उद्यापर्यंत बंद राहणार असून, मध्यरात्रीपासून ती पुन्हा सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल नाक्‍यांवर कार्ड स्वाइप मशिन बसविण्यात आले आहेत. वाहनधारकांना डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे टोल भरता येणार आहे. 

काही सवलती कायम 

पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी स्वीकारण्यात येतील. सरकारी सुविधांची बिले भरण्यासासाठी पाचशे व हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, रेल्वे तिकिटे, सरकारी बसची तिकिटे यांच्या खरेदीसाठी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा चालणार आहेत. 

Web Title: Petrol pump, tomorrow from airports close to the old notes