पेट्रोलच्या दरात 2.21 रुपये वाढ

पीटीआय
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.21 रुपये; तर डिझेलच्या दरात 1.79 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू झाली.

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.21 रुपये; तर डिझेलच्या दरात 1.79 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू झाली.

नोटाबंदीमुळे संतप्त जनतेच्या रोषात पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे तेल ओतले जाण्याची शक्‍यता असल्याने दरवाढ काही दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय आज सकाळी घेतला गेला होता. मात्र, सरकारी कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या भावाचा आढावा घेऊन दरवाढ जाहीर केली. सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या 1 व 16 तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने कंपन्यांनी दरवाढ पुढे ढकलणे टाळले.

Web Title: petrol rate increase