राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट

टीम ई सकाळ | Sunday, 19 July 2020

राजस्थानातील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. आता राजस्थानच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला असून केंद्रीय गृहमंत्रालयामे फोन टॅपिंग प्रकरणात राज्याच्या प्रमुख सचिवांकडून रिपोर्ट मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावर टीका केली असून याला प्रायवसीचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

जयपूर : राजस्थानातील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. आता राजस्थानच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला असून केंद्रीय गृहमंत्रालयामे फोन टॅपिंग प्रकरणात राज्याच्या प्रमुख सचिवांकडून रिपोर्ट मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावर टीका केली असून याला प्रायवसीचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गृहमंत्रालयाने कथित रुपात व्हायरल होत असलेल्या फोन कॉल ऑडिओची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणावर गृहमंत्रालयाच्या करडी नजर आहे. या प्रकरणाची राजस्थान पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, काँग्रेसने असा आरोप केला आहे की, ऑडिओ राजस्थानमध्ये गेहलोत सरकारला पाडण्यासाठी संजय जैनसोबत भंवर लाल शर्माचा यामध्ये आवाज आहे. यामध्ये ३० आमदारांवर भंवरलाल शर्मा आणि संजय जैन यांच्यात चर्चा होत आहे. या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसओजीची टीम मानेसरमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. मात्र  तेथे भंवरलाल शर्मा सापडले नाहीत.

ज्या टेपच्या पुराव्यानुसार काँग्रेस भाजपचा खरा चेहरा समोर आणण्याचा दावा करत आहेत. त्यावरच भाजपने आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप प्रवक्ता संबित पात्राने म्हटलं की, राजस्थान सरकार सगळ्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करत आहे. कोरोनाच्या काळात जिथे लोकं व्हेंटिलेटरकरता हैराण झाले आहे तिथे काँग्रेस आमदार स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत आहेत.

भावनिक अन्‌ दिलासादायक शब्दांचाच महापूर : नेत्यांतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने बाधितांची लागली पुरती वाट 

एका दिवसात बुधवारी (ता. 14) ढगफुटीने जिल्ह्यात (193.6 मिलीमीटर) दाणादाण उडाली. तर उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील 241 मिलीमीटरच्या अतिवृष्टीने भीमा नदीला महापूर आला. तब्बल 72 वर्षानंतर सोलापूरकरांनी हा अनुभव घेतला. या अस्मानी संकटात तब्बल 16 जणांचे जीव गेले. पंढरपुरातील घाटाचे बांधकाम कोसळून मजुरांचा जागीच प्राण गेला. अक्कलकोट तालुक्‍यावर कधी नव्हे इतके भयावह संकट कोसळले. अतिवृष्टीने जिल्हाभरातील जवळपास 58 हजार हेक्‍टरवरील तर एका अक्कलकोट तालुक्‍यातील 20 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी झाली. यामुळे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी थेट अक्कलकोट गाठले. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु असल्याने दररोज "अपडेट' येतच आहेत.