विंग कमांडर अभिनंदन यांच्या फोटोचा भाजपकडून बॅनरवर वापर

विंग कमांडर अभिनंदन यांच्या फोटोचा भाजपकडून बॅनरवर वापर

नवी दिल्ली - पॉंडेचरी भाजपने टिविट् केले यात जर देशात काँग्रेस सरकार असते तर अभिनंदन परतला नसता मात्र हे मोदी सरकार आहे त्यामुळे 56 तासांत अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली अशा मजकूर टिवि्ट केला आहे. त्याचबरोबर, भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना भारतात आणल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पोस्टर्स लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांचा पाठलाग करत अभिनंदन हे पाकिस्तानात गेले होते. मात्र विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने अभिनंदन यांना पाकिस्तान सैन्याने जेरबंद केले. मात्र लगेच पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांची सुटका करणार असल्याचं जाहीर केले. 1 मार्च रोजी वाघा बोर्डरमार्गे पायलट अभिनंदन वर्धमान भारतात सुखरूप परतले, संपुर्ण देशभरात अभिनंदन यांचे जल्लोषात स्वागत केले.

या घटनेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन यांचे पोस्टर्स लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. आता यावरून नेटीझन्सनी भाजपला चांगलेच धारेवर धरले असून सोशल मिडियावर याबाबत भाजपविरोधात संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com