लैंगिक शोषण झालेल्या मुलालाही भरपाई हवी ; केंद्रीयमंत्री मेनका गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

महिला बाल कल्याण मंत्रालयाने लैंगिक शोषणावर 2007मध्ये अखेरचा अधिकृत सर्व्हे केला होता. यामध्ये 53.2 टक्के मुलांनी एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारच्या लैंगिक शोषणाचा सामना केल्याचे आढळून आले होते. यामध्ये 52.8 टक्के मुले होती. 

 

नवी दिल्ली, ता. 25 (पीटीआय) : मुलींसाठी बनविण्यात आलेल्या कायद्याच्या धर्तीवर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या मुलांनाही नुकसानभरपाई देण्यासाठी सध्याच्या योजनेत दुरुस्तीचा प्रस्ताव आज महिला-बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी आज ठेवला. 
गांधी यांनी बाल लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या पीडित मुलांच्या प्रकरणांचा अभ्यास करण्याचीही घोषणा केली. 

पुरुषांसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास असेल. मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी चित्रपट निर्माता इंसिया दरीवाला यांच्या चेंज डॉट ओआरजीवरील एका याचिकेला दिलेल्या उत्तरात मेनका यांनी म्हटले आहे, की बाल लैंगिक शोषणामध्ये सर्वाधिक दुर्लक्ष केला जाणारा घटक पीडित मुलांचा आहे. बाल लैंगिक शोषणामध्ये लैंगिक आधारावर कोणताही भेद नाही. बालपणी लैंगिक शोषणाचे बळी ठरणारी मुले कलंक तसेच लाजेमुळे आयुष्यभर शांत राहतात. ही गंभीर समस्या आहे आणि यावर तोडगा काढण्याची गरज आहे. 

दरम्यान, या याचिकेनंतर मेनका गांधी यांनी राष्ट्रीय बाल सुरक्षा हक्क आयोगाला पीडित मुलांच्या मुद्यावर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून अशा मुलांना नुकसानभरपाई मिळू शकेल. 
 

Web Title: Physically Harassment give Compensation to Boy says Minister Maneka Gandhi